विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय सेवा-स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिर- निखिल वारे

Ahmednagar Breaking News
0

 विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय सेवा-स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिर- निखिल वारे.

 अहमदनगर-(प्रतिनिधी)-विविध शासकीय सेवा व स्पर्धां परिक्षांच्या तयारीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थीसाठी जगदंब युवा प्रतिष्ठानच्यावतीने शनिवार दि.8 ऑक्टोबर रोजी सायं. 4.30 वा. नगर-औरंगाबाद रोडवरील दसरेनगर येथील आनंद लॉन्समध्ये ‘वेध भविष्याचा’ हा कार्यक्रम होत असून, प्रसिद्ध व्याख्याने गणेश शिंदे मार्गदर्शन करुन प्रबोधन करतील. खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप यांच्या शुभेहस्ते ‘वेध भविष्याचा’ या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, कर्जतचे पो.उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव, श्रीरामपूरचे पो.उपाधिक्षक संदिप मिटके, उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील, गणेश बारगजे, विभागीय उपनिबंधक दिग्वीजय आहेर, प्रातांधिकारी श्रीनविास अर्जुन, सहाय्यक आयुक्त नितीन ककले तसेच नगरसेवक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे, असे श्री.वारे यांनी सांगितले. 
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी चांगले करिअर घडविण्यासाठी, असे नाविन्यपूर्ण उपक्रम होणे ही काळाची गरज आहे. दि.8 रोजी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आगळी-वगेळी भेट महणून या कार्यक्रमाचे आयोजन जगदंब युवा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून,आजच्या तंत्राानाच्या युगात आपण जगाबरोबर धावतो आहे. बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल केला तर स्पर्धेच्या युगात आपण टिकणार आहोत. त्यासाठी आजच्या तरुण पिढीला चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे, ही गरज लक्षात ठेवून नगर जिल्ह्यात प्रथमच विविध सेवा व स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या विद्यार्थी व पालकांच्या प्रबोधनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला, अशी माहिती जगदंब युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिली.
तरी या कार्यक्रमाच्या लाभ विद्यार्थी, पालक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री.वारे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top