आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा समस्त आंबेडकरी समाजाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Ahmednagar Breaking News
0

 आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा समस्त आंबेडकरी समाजाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी.


अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील तपोवन रोड भागातील भिस्तबाग येथे 3 ऑक्टोबर रोजी जावयाने आपल्या पत्नीला आणि सासर्‍याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती त्यानंतर या दोन्ही गंभीर जखमींचे आज सकाळी पुणे येथे उपचार चालू असताना निधन झाले आहे. या मारहाणीत कीर्ती भेटे आणि विश्वनाथ कसबे गंभीर जखमी झाले होते. तर कसबे यांचा जावई महेश भेटे याने हे कृत्य केले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये महेश भेटे यांच्याविरुद्ध कीर्ती भेटे हिच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. मात्र या गुन्ह्यात मोहन माणिक भेटे, मंगल माणिक भेटे यांना सहआरोपी करुन ॲट्रॉसिटी कायदयानुसार कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देऊन करताना अजय साळवे, रोहित (बंडू) आव्हाड, सुनील क्षेत्रे, विशाल गायकवाड, अमित काळे,  सुमेध गायकवाड, महेश भोसले, सुनील शिंदे, सुशांत म्हस्के, सोमा शिंदे, योगेश थोरात, निलेश साळवे, संतोष जाधव, निलेश बनसोडे, जय चक्रनारायण, मंगेश तिजोरे, रोहन गोरखा, बबलू विश्वल गायकवाड, तुकाराम गायकवाड, दीपक मोहिते, समीर शेख, जहीर शेख, सुशील गायकवाड, ललित गोरडे, यासर शेख, अल्ताफ कुरेशी, मनोज प्रभुणे, निलेश साळवे, संतोष जाधव, चंद्रकांत भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, जय गरजमल, मंगेश तिजोरे, रोहन गोरखा, सागर ठोकळ, दया गजभिये, रोहित कांबळे, पवन भिंगारदिवे आदी समाज बांधव उपस्थित होते. 
पत्नी आणि सासऱ्याला मारहाणीच्या गुन्ह्यात महेश माणिक भेटे यास अटक करण्यात आली. परंतु त्याला सहकार्य करणारे व मुलीस वारंवार जाती वरून त्रास देणारे आरोपीचा भाऊ मोहन माणिक भेटे याने वेळोवेळी आरोपीला समजावन्याऐवजी पाठबळ देऊन निघूर्ण कृत्य करण्यास भाग पाडले. तसेच आरोपीची आई मंगल माणिक भेटे हीने वेळोवेळी मुलीस व कसबे कुटूंबास माणसिक शारिरिक छळ करुन आरोपीच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपी व त्याचा भाऊ मोहन माणिक भेटे, मंगल माणिक भेटे व माणिक भेटे यांची घटना घडण्यापूर्वी व घडल्यानंतरचे मोबाईलवरील सर्व कॉल रेकॉर्ड त्वरित तपासण्यात यावे खुनाच्या गुन्हयात अप्रत्यक्ष मदत करुन आरोपीस पाठीशी घातले त्यामुळे मोहन भेटे, मंगल माणिक भेटे व आरोपीचे वडील माणिक भेटे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना त्वरित अटक करावी. अन्यथाः दोन्हीही मृत्यूदेहांवर अंत्यविधी न करता एसपी कार्यालयासमोर मृतदेह आणुन ठेवण्यात येतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात  आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top