कार्तिक नन्नवरेला स्केटिंग स्पर्धेत रौप्य पदक.
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त खुल्या निमंत्रित राज्य स्तरीय गोल्ड काॅईन स्केटिंग स्पर्धेचे आयोजन याक पब्लिक स्कूल, खोपोली (रायगड जिल्ह्या ) येथे अंतरराष्ट्रीय स्केटिंग रींक येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी अवघ्या 7 वय वर्ष असलेला कु. कार्तिक संजय नन्नवरे याने काॅड या स्केटिंग प्रकारात रौप्य पदक पटकवले आहे. या स्पर्धे करीता अवघ्या महाराष्ट्रातून 900 हुन अधिक स्केटिंग खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमधे खेळाडूंना सोन्या, चांदीचे पदकांनी सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत अनेक जिल्ह्यातील खेळाडूंना अत्यंत चुरशीची लढत देत कार्तिकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कार्तिक हा वय वर्ष 4 असल्या पासुन स्केटिंग या खेळाचा सराव करत आहे. त्याने आज पर्यंत विविध स्तरांवरील स्पर्धेत अनेक सुवर्ण, रौप्य पदककांची कमाई केली आहे. कार्तिकचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटिंग तसेच आईस स्केटिंग क्षेत्रात देशाचे नाव उंचवीण्याचे मानस आहे. कार्तिक हा नवीन मराठी शाळा विश्रामबाग येथील विद्यार्थी असून अ.नगर जिल्ह्यातील नावाजलेली व स्केटिंग क्षेत्रातील एकमेव नामांकित टिम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी. येथे अंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. कार्तिकचे अकॅडमीचे पदअधिकारी अँड.आसिफ शेख, सागर कुक्कडवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या गांगर्डे यांनी भरभरून कौतुक करत अभिनंदन केले. तसेच अकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत पाटोळे व सहप्रशिक्षक कृष्णा आल्हाट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कु. कार्तिक हा एस.आर.नन्नवरे असोसिएटचे संचालक संजय नन्नवरे यांचा मुलगा आहे.