शहर सहकारी बँक निवडणूक. घैसास - गुंदेचा पॅनलचे संजय घुले यांची बिनविरोध निवड.

Ahmednagar Breaking News
0

शहर सहकारी बँक निवडणूक. घैसास - गुंदेचा पॅनलचे संजय घुले यांची बिनविरोध निवड.

नगर, प्रतिनिधी.(२४. नोव्हेंबर.) : अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत नागरिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी)मतदार संघातून घैसास-गुंदेचा पॅनेलचे उमेदवार संजय विठ्ठलराव घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

              अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी २८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी २५ नोव्हेंबर ही अंतिम मुदतआहे. तत्पूर्वी गुरुवारी (दि.२४) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) मतदार संघातून अर्ज दाखल करणारे घुले स्वप्निल आणि डेरे पराग यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे एका जागेसाठी केवळ घुले संजय विठ्ठलराव यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे.दरम्यान, गुरुवारी (दि. २४)सर्वसाधारण मतदार संघातून संजय घुले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर या मतदार संघातून रविंद्र नंदकुमार औटी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

           अर्ज माघारीचा शुक्रवारी (दि. २५) शेवटचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी अजून किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात यावर बँकेच्या बिनविरोध निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांचे घैसास-गुंदेचा पॅनलकडून आभार व्यक्त करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक गणेश पुरी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अल्ताफ शेख हे काम पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top