एमआयडीसी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची टोळी गावठी कट्ट्यासह केली जेरबंद.
अहमदनगर, प्रतिनिधी.(दि.२६ नोव्हेंबर): रोड रॉबरी करणारी परप्रांतीय सराईत गुन्हेगारांची टोळी जिवंत काडतुस व गावठी कट्ट्यासह जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.९,९३,७२८/- रुपयांचा मुददेमाल यावेळी हस्तगत करण्यात आला आहे.एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दि.२१/१०/२०२२ रोजी फिर्यादी नामे मारुती चंद्रकांत जाधव (वय-३९ वर्ष रा कोंढवा खुर्द ता.हवेली जि.पुणे)यांनी फिर्याद दिली की,फिर्यादी हे जालना येथुन ज्वारी हे १२ टन भुसार धान्य भरुन त्यांचे ताब्यातील ट्रक नंबर एम एच १२ डीटी ४४३३ ही औरंगाबाद-अहमदनगर हायवेने पुणे येथे घेवुन जात असताना त्यांची मालट्रक ही दि. २०/१०/२०२२ रोजी रात्री २.३० वाजताचे सुमारास इमामपुर घाट,इमामपुर, ता.जि-अहमदनगर येथे घाट चढुन वर आलेली असताना अज्ञात आरोपी यांनी दोन मोटार सायकलवर येवुन मोटार सायकल ट्रकला आडव्या लावुन ट्रक थांबवुन ट्रकचे कॅबीनमध्ये चढुन फिर्यादी यांचा मोबाईल,रोख रक्कम काढुन घेवुन त्यांचे हात,पाय,तोंड,डोळे बांधून त्यास मारहाण करुन त्यांचे ताब्यातील ट्रक त्यांचे ताब्यात घेवुन रस्त्याने सुमारे दोन तास ट्रक चालवत नेल्यानंतर कोणत्यातरी अज्ञात ठिकाणी त्यांचे हात,पाय,डोळे,तोंड बांधलेले स्थितीत फिर्यादी यांना ट्रकमधुन बाहेर काढुन एका ओमीनीमध्ये टाकुन नंतर ओमीनीने नेवासा फाटा मार्गे,कुकाणा येथे शेवगाव रोडला पहाटे ६.०० वाजताचे सुमारास रस्त्यावर सोडुन दिलेले असल्याचे सांगुन अज्ञात आरोपी व त्यांना कोणत्या वाहनाने कोठुन नेवुन कुकाणा येथे सोडले.ट्रक नेमकी कोणत्या दिशेला नेलेली आहे. याबाबत काहीएक माहीत नसल्याचे व ट्रकमध्ये जी.पी.एस.सिस्टीम नसल्याचे सांगितले होते.या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर-७९८/२०२२ भादवि कलम ३९४,३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोउपनिरी/हंडाळ यांचेकडे देण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास करुन आरोपी व ट्रकसह चोरीस गेलेले मालाचा शोध घेणे हे एम.आय.डी.सी.पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.सदर गुन्हयाचा तपास करत असताना सदर गुन्हयातील ट्रक ही दिंडोरी पोलीस ठाण्याचे हददीत बेवारस स्थितीत रिकामी मिळुन आली.सदर ट्रक ही एम.आय.डी.सी. पोलीसांनी ताब्यात घेतली असता सदर ट्रकमधील माल हा नेवासा ते मालेगाव या दरम्यान कोणत्यातरी अज्ञात ठिकाणी खाली केलेला असावा असा प्राथमिक अंदाज आल्याने सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या १२ टन ज्वारी या भुसार धान्याचा व आरोपींचा शोध घेणेकामी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग,पोनि/अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी पोलीस ठाणे येथुन एक तपास पथक दि.२७/१०/२०२२ रोजी नेवासा,गंगापुर, येवला, मनमाड, मालेगाव या परिसरात रवाना केले असता त्यांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समीती मार्केट यार्ड येथे गोपनीय माहीती काढुन एकमोकळं अनोळखी इसम हा ज्वारी हे भुसार धान्य विक्रीसाठी घेऊन येत असल्याबाबत व सदर सदर ज्वारी हे भुसार विक्री केल्यानंतर रोख स्वरुपात पैसे मागत असल्याबाबत माहीती मिळाली. सदर माहीतीवरुन त्या अज्ञात इसमाचा मोबाईल नंबर मिळवुन त्याचा शोध घेतला असता तो खुलताबाद येथे राहणारा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास खुल्ताबाद येथुन दि.०४/११/२०२२ रोजी ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव१)असिम सईद बुखारी असे असल्याचे सांगुन सदर ट्रक चोरीचा गुन्हा हा त्याने खुल्ताबाद येथे राहणारा आरोपी २) नासीर गफार अब्दुल याचेसह, अहमदनगर मुकुंदनगर येथे राहणारा ३)मुस्ताक अहमद गुलाम रसुल शेख, उत्तरप्रदेशचे ४)अमरसिंग मठलुराम सिंग वय ३२ वर्ष डंडी,पो,डंडी ता.करच्छना जि.इलाहाबाद उत्तरप्रदेश,५) पियुष कौशल शुक्ला वय - २२ वर्ष रा. मिसोलिया विदयाभवन पो. नारायणपुर ता. बसडीह जि बलिया उत्तरप्रदेश,पश्चिम बंगालचा राहणारा ६ ) मेहबुब ईस्माईल शेख वय ३० वर्ष रा.सकलपुर घोसपाडा पो.बांगीटोलाता.कालीया चौक जि.मालदा यांचेसह एकत्रित येवुन केलेला असल्याचे व सदर चोरीचा माल विकण्याची जबाबदारी त्यांनी माझेकडे दिलेली असल्याचे सांगितले. सदरवेळी असीम बुखारी याचेकडुन मालेगाव येथुन एका गोदामातुन १२ टन ज्वारीपैकी ७ टन ज्वारी रिकव्हर करण्यात आलेली असुन,आरोपी नामे-मुस्ताक शेख याचेकडुन गुन्हयात वापरलेली ओमीनी गाडी व इतर एक शाईन मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.सदर गुन्हयातील अमरसिंग,पियुष शुक्ला,मेहबुब शेख यांचा पोलीस शोध घेत असताना तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत सदर इसम हे विळद घाट येथे आलेले असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाली. त्यावेळी पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावुन त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात ३०,०००/- रु किमतीचे एक गावठी कटटा व २००/- रु किमतीचे दोन जिवंत काडतुस मिळुन आले असुन सदर गावठी कटटयाचा वापर आम्ही रोड रॉबरी करताना धाक दाखविण्यासाठी करणार होतो असे सांगितले असुन ट्रक चोरी केलेल्या गुन्हयाची कबुली दिलेली आहे.
त्यावरील आरोपी विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं-९०८/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५, ७, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयातील एकुण-०६ आरोपींना अटक करण्यात आलेली असुन सदर आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन आरोपी नामे१) अमरसिंग मठलुराम सिंग याचेवर १) जी.आर.पी. पो. ठाणे फरिदाबाद यु.पी येथे गु.र.नं- ८८/२०१४ भादंविसं- ३९९,४०२.२)सिडको पोलीस ठाणे औरंगाबाद शहर गु.र.नं-०३३/२०१४ भादंविसं - ३९५.३)वाळुंज पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रा. येथे गु.र.नं- ३२/२०१४ भादंविसं-३९९,४०२. २)मेहबुब ईस्माईल शेख याचेवर १)बिडकीन पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रा. येथे गु.र.नं-१४२/२०१४ भादंविसं - ३९९,४०२.३) मुस्ताक अहमद गुलाम रसुल शेख याचेवर,१) वाकुंज पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रा. १३०/२०११ भादंविसं-३०२,१२०(ब). (आण्णा लष्करे खुन प्रकरण) ४) नासीर गफार अब्दुल याचेवर १) करमाड पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रा.गु.र.नं-११८/२०१८ भादंविसं-४५७,३८०प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग,पोनि.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री.युवराज आठरे प्रभारी अधिकारी एमआयडीसी पो.स्टे, पोउपनिरी/चांगदेव हंडाळ,पोसई/योगेश चाहेर,चालक कावरे,पोकॉ/२३७६ गजानन गायकवाड,पोशि/१२१० किशोर देशमुख,पोकॉ/ज्ञानेश्वर तांदळे,पोहेकॉ / संदीप खेंगट,पोना/ ७३४ दिपक गांगर्डे,पोना/ गणेश जाधव, पोकॉ /१६८८ भगवान वंजारी,पोकॉ /२६३२ सुरज देशमुख यांनी केलेली आहे.