पेमराज सारडा कॉलेजची विद्यार्थिनी रेणुका निसळ हिला उदयोन्मुख वक्ता पारितोषिकाने गौरवण्यात आले.
नगर, प्रतिनिधी. पेमराज सारडा कॉलेजची विद्यार्थिनी रेणुका निसळ हिला आज नगर कॉलेज इथे झालेल्या रूथबाई हिवाळे वक्तृत्व स्पर्धेत उदयोन्मुख वक्ता या विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आलं. रेणुका निसळ ही बारावी कला शाखेची विद्यार्थिनी आहे.तिला प्रा. अविनाश झरेकर,प्रा.प्रसाद बेडेकर यांच मार्गदर्शन लाभलं.तिचे हिंदसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी,पेमराज सारडा कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले.