जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार व मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे.
अहमदनगर,प्रतिनिधी.(२४ नोव्हेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार व मटका अशा १७ अवैध धंद्याविरुध्द कारवाई करुन एकुण १,८७,४९०/- रु. किंमतीची रोख रक्कम व इतर मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवून अवैध धंद्यांवर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांनी दि.१४/१२/२०२२ ते २३/१२/२०२२ पर्यंत जिल्ह्यातील जुगार व मटका अशा अवैध विरुध्द कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमुन विशेष मोहिमचे आयोजन करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या विशेष मोहिमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संगमनेर, अहमदनगर शहर, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहुरी,जामखेड, कोपरगांव,शेवगांव अशा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत चालु असलेले १७ जुगार,मटका अवैध धंद्याविरुध्द कारवाई करून १,८७,४९०/- किंमतीची रोख रक्कम व जुगारीची साधने जप्त करुन २६ आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कारवाई केलेली आहे.