स्नेहालय संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेत स्व.सुधाकर राम संगीत केंद्राचे लोकार्पण.
अहमदनगर, प्रतिनिधी. : स्नेहालय संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेत स्व.सुधाकर राम संगीत केंद्राचे लोकार्पण उद्या सकाळी 10 वाजता होता आहे . प्रख्यात गायक पवन नाईक ,श्रीमती गिरीजा राम आदी यावेळी उपस्थित रहाणार असल्याचे विद्यालयाचे संचालक राजेंद्र शुक्रे , हनीफ शेख आणि मुख्याध्यापिका क्षितिजा हडप यांनी सांगितले.
स्व. सुधाकर राम हे मास्टेक या संगणक कंपनीचे एक संस्थापक होते. स्नेहालय संस्थेशी त्यांचा निकट संबंध होता. त्यांना संगीताची आवड होती. ते स्वतः गिटार उत्तम वाजवीत असत. त्यांचे वाद्य श्रीमती गिरीजा स्नेहालयाला भेट देणार आहेत. देशी विदेशी वाद्यांचे एक प्रदर्शन येथे निर्माण केले जाणार आहे. स्नेहालय तसेच संलग्न अनामप्रेम या संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना संगीत साधनेसाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे. 800 चौरस फुटांच्या जागेत सर्व देशी-विदेशी वाद्यांची साधना विद्यार्थ्यांना येथे करता येणार आहे.स्नेहालयच्या इंग्रजी माध्यम विद्यालयात भूगोल पार्क, गणित - संगणक आणि शास्त्र यांच्या शिक्षणाचे अद्ययावत उपक्रम मागील तीन वर्षात करण्यात आले असल्याचे श्री. शुक्रे यांनी सांगितले.संगीत केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून येणाऱ्यांनी 9011020177 या क्रमांकावर संदेशद्वारे सूचित करावे ,असे आवाहन संस्थेने केले आहे.