रात्री झोपेत असतानाच केला गळा दाबून खून.

Ahmednagar Breaking News
0 minute read
0

रात्री झोपेत असतानाच केला गळा दाबून खून.

अकोले,प्रतिनिधी.(१७. डिसेंबर) : अहमदनगर जिल्ह्या, अकोले तालुक्यातील उडदावणे गावातील सुनील गिर्हे या व्यक्तीचा गळा दाबून खून झाल्याची घटना घडली आहे. यामुळे उडदावणे गावात व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.या व्यक्तीच्या अंगावार जखमा दिसून येत असून रात्री झोपेतच हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या घटनेची खबर गावातील पोलीस पाटील यांनी राजूर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर राजूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला व मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.पुढील तपास राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे हे करीत आहे.

To Top