वाडिया पार्क स्टेडियम मध्ये शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन.
नगर प्रतिनिधी.(०२. डिसेंबर.) : अहमदनगर महानगर पालिका क्रीडा विभाग, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय बुद्धिबळ स्पर्धचे शानदार उद्घाटन नुकतेच करण्यात आले.अहमदनगर महापालिका हद्दीतील वयोगट 14 वर्षाखालील,17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील मुले व मुली ह्यांच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन नुकतेच वाडीया पार्क स्टेडियम, अहमदनगर येथे करण्यात आले.
या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील विविध गटात जवळपास 175 खेळाडूंनी सहभाग घेतला. अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेच्या वतीने या सर्व स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव श्री यशवंत बापट सर ,विश्वस्त श्री पारुनाथ ढोकळे सर, खजिनदार श्री सुबोध ठोंबरे सर, विश्वस्त श्री शाम कांबळे सर, श्री चेतन कड , श्री देवेंद्र ढोकळे, श्री. संजय खडके सर, श्री. विष्णू कुद्रे सर, श्री सुनील जोशी सर, श्री गोरक्षनाथ पुंड सर, श्री शाम वागस्कर सर,सौ. अनुराधा बापट, सौ डॉ स्मिता वाघ इ.यांनी परिश्रम घेतले व आपले बहुमोल योगदान दिले.
स्पर्धेचे उद्घाटन महापालिका क्रीडा अधिकारी श्री फिलिप्स सर व पेमराज सारडा महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा श्री. संजय साठे सर ह्यांच्या हस्ते पटावर चाल देऊन झाले. या उद्घाटनप्रसंगी श्री. सतिश टकले सर, श्री.निलेश भालेराव सर, श्री.आकाश थोरात सर , श्री. निलेश बांगर सर, श्री. अजित लोळगे सर, श्री प्रदीप सर,श्री. नवनीत कोठारी साहेब उपस्थित होते. ह्यावेळेस बॅडिंटनचा हॉल पालक, क्रीडा शिक्षक व खेळाडू ह्यांनी संपूर्ण भरला होता.