नगरमधील कलाकार असलेले सुमित दिलीप तनपुरे यांच्या फतवा चित्रपटाचे पुण्यामध्ये शानदार प्रमोशन.

Ahmednagar Breaking News
0

नगरमधील कलाकार असलेले सुमित दिलीप तनपुरे यांच्या फतवा चित्रपटाचे पुण्यामध्ये शानदार प्रमोशन.



नगर,प्रतिनिधी.(०४. डिसेंबर.) : मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत यांचा प्रेम कहानी वर आधारित फतवा चित्रपट येत्या 9 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे पुण्यातील हडपसर मधील शेवाळवाडीत अभिनेता सुभाष यादव यांच्या कार्यक्रमात शानदार प्रमोशन करण्यात आले. यावेळी चित्रपटातील सहकलाकारांना  पाहण्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

             या चित्रपटात नगर मधील सुमित दिलीप तनपुरे यांची सह खलनायकाची भूमिका असणार आहे. तसेच छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले,संजय खापरे,अमोल चौधरी,निलेश वैरागर,निखिल निकाळजे, पुनम कांबळे, सोना,आकाश, वैभव, सादिक, किरण, शरद  दिसणार आहेत. या चित्रपटाची डॉ. यशवंत,प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी निर्मिती केली आहे.या चित्रपटातील गीत प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी "पुन्हा- पुन्हा " गायले आहे. वेगवेगळ्या रंगातील सहा गाणी या चित्रपटात प्रेक्षकांसाठी बाबा चव्हाण यांनी लिहिली आहेत.

          


  थोड्याच दिवसात नगर मधील नावाजलेल्या महाविद्यालयात या चित्रपटाचे प्रमोशन होणार आहे अशी माहिती सुमित तनपुरे यांनी एबीएनशी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top