लाच घेताना महिला सरपंच व क्लार्कवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Ahmednagar Breaking News
0

लाच घेताना महिला सरपंच व क्लार्कवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नगर,प्रतिनिधी.(10.जानेवारी) : कंत्राटदार यांनी निंबळक गावातील निंबळक - लिंगतीर्थ रस्त्याचे मजबुती करण्याचे कामाचा ठेका जिल्हा परिषद अहमदनगर कडून घेतला होता. या रस्त्याच्या कामाची टक्केवारीची 20 हजारांची लाज घेताना महिला सरपंच व क्लार्क यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार- पुरुष वय- ३०,रा सोनेवाडी, ता-नगर, जि.अहमदनगर

आरोपी १) प्रियांका अजय लामखडे, वय ३५, सरपंच, निंबळक, ता- नगर, जि. अहमदनगर रा- निंबळक

२) दत्ता वसंत धावडे, वय ४०, धंदा – नौकरी, लिपिक, ग्रामपंचायत निंबळक.

लाचेची मागणी- २००००/-₹

लाचेची मागणी – ता.१०/०१/२०२३

▶️ लाच स्विकारली – २००००/- ₹

▶️ लाच स्विकारली दिनांक – १०/०१/२०२३

▶️ लाचेचे कारण -.तक्रारदार हे कंत्राटदार असुन, त्यांना निंबळक गावातील निंबळक – लिंगतीर्थ रस्त्याचे मजबुती करण्याचे कामाचा ठेका जिल्हा परिषद अहमदनगर कडुन मिळाला होता. त्यांनी सदर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करुन केलेल्या कामाचे बील ₹ १३६५०५६ मंजुरी साठी जिल्हा परिषद मध्ये सादर केले होते. सदर बिल मंजूर होऊन ग्रामपंचायत निंबळक यांचे बॅंक खात्यामध्ये जमा झाले होते. तक्रारदार यांना ₹ १२,३८,५५६ /- चा चेक सरपंच व ग्रामसेवक यांचे सहीचा मिळाला होता त्यावेळी सुद्धा आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार यांचेकडून पैसे घेतले नंतरच चेक वर सही केली होती. तक्रारदार यांचे बिलातील ₹ १,२६,०००/- रक्कम जी एस टी पोटी ग्रामपंचायत ने राखुन ठेवली होती. तक्रारदार यांनी जी एस टी पुर्तता करुन , ₹ १,२६,०००/- रकमेचा चेक ग्रामपंचायत निंबळक घ्या ग्रामसेविका यांचे कडे मागणी केली असता, ग्रामसेविका यांनी चेक वर सही करुन चेक तयार ठेवला होता, परंतु सदर चेक वर सही करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार यांचेकडे ₹ २०,०००/- ची मागणी केली असल्याची तक्रार, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे आज रोजी दिली. सदर तक्रारीचे अनुषंगाने आज रोजी निंबळक येथे लाच पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक क्रमांक १ व २ यांनी तक्रारदार यांचे कडे ₹ २०,०००/- मागणी करुन सदर रक्कम आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी आरोपी लोकसेवक क्रमांक २ याचे कडे देण्यास सांगितले. रक्कम मिळाले नंतरच तक्रारदार यांचे बिलाचे चेक वर सही करेन असे आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी सांगितलेचे स्पष्ट पणे निष्पन्न झाले. त्यावरून आज रोजी निंबळक ग्रामपंचायत समोर लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक क्रमांक २ याने तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष ₹ २०,०००/- लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस स्टेशन एम आय डी सी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ सापळा अधिकारी:- गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top