निर्मल नगर रस्त्याला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे मार्ग असे नामकरण करण्यास आयुक्तांनी दिली मंजुरी.

Ahmednagar Breaking News
0

निर्मल नगर रस्त्याला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे मार्ग असे नामकरण करण्यास आयुक्तांनी दिली मंजुरी.

नगर,प्रतिनिधी.(16.फेब्रुवारी.) : निर्मलनगर रस्त्याला "लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे मार्ग "असे नामकरण करण्यास माननीय आयुक्त साहेब यांनी मंजुरी दिली असून उद्या शुक्रवार दि.17फेब्रुवारीला होणाऱ्या महासभेत शिक्का मोर्तब होणार आहे, या रस्त्याच्या नामकरनासाठी माननीय आमदार संग्रामभैया जगताप, माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील, महापौर रोहिणीताई शेंडगे,उपमहापौर गणेश भोसले यांचे,तसेच  प्रभागातील नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, रुपालीताई वारे, संध्याताई पवार, सुनील त्रिम्बके व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ काळे यांचे  सहकार्य लाभले. लवकरच या रस्त्याच्या डांबरी करणासाठी निधी उपलब्ध करणार असून त्यामुळे निर्मल नगर परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे असे मा.नगरसेवक निखील वारे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top