चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अवघ्या 20 दिवसात जामीन मंजूर.

Ahmednagar Breaking News
0

सिद्धार्थनगर येथील बहुचर्चीत खून प्रकरणातील चार वर्षांपासून  फरार असलेल्या आरोपीला अवघ्या २० दिवसात जामीन मंजूर.


नगर प्रतिनिधी. (28. मे.) : अहमदनगर येथील बालिकाश्रम रोड भागातील सिद्धार्थनगर येथे सन २०१९ ला बेबी अर्जून शिरसाठ या महिलेचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता.तसेच तिच्या इतर नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली होती.

सदर गुन्ह्यातील आरोपी बाळु अशोक घोरपडे हा गुन्हा घडल्याचे दिवसापासून फरार झाला होता.त्यास पोलीसांनी दि. ०३/०५/२०२३ रोजी अटक करुन अहमदनगर येथील चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांचे समोर हजर केले. तदनंतर सदर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायाधिश,अहमदनगर यांचे समोर जामीन अर्ज दाखल केला.त्याच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील यांनी त्याच्या जामीनास युक्तीवाद करुन तिव्र विरोध दर्शविला होता व सदर आरोपीचा सदरच्या खून खटल्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे मत नोंदविले होते. तदनंतर आरोपी याच्या वकीलांनी आरोपी याचा सदर खून प्रकरणात सहभाग नसल्याबाबत युक्तीवाद करुन तो मे.कोर्टास पटवून दिला. सदरच्या आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मे.कोर्टाने आरोपीस जामीन मंजूर केला.

आरोपीच्या वतीने अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग व अॅड. निरंजन आढाव यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top