302 गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता.आरोपीतर्फे ऍड महेश तवले यांनी काम पाहिले.
नगर,प्रतिनिधी.(06. मे.) : राहुरी पोलीस स्टेशन येथे 19 सप्टेंबर 2020 रोजी आरोपी विरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबतचा तपास पूर्ण होऊन 14 डिसेंबर 2020 रोजी आरोपी विरोधात अहमदनगर सेशन कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आले. सदर केस मध्ये सरकार पक्षातर्फे गुन्ह्यातील साक्षीदार तपासण्यात आले. परंतु आरोपी विरुद्ध कुठलाही सबळ पुरावा नसल्याने आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.सरकार पक्ष आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करू शकला नाही.आरोपीतर्फे ऍड महेश तवले यांनी काम पाहिले.