प.पू.गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
नगर, प्रतिनिधी. (11.मे.) : आर्ट ऑफ लिविंग,अहमदनगर आयोजित परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसा निमित्ताने 13 मे 2023 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे.
सकाळी 8:00 वाजता आयुष होम करण्यात येईल. त्यानंतर 9:00 ते 12:00 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणे,दंत चिकित्सा,आरोग्य तपासणी,रक्त तपासणी या तपासण्या सर्वांसाठी मोफत असणार आहेत. या सर्व तपासण्या स्पेशालिस्ट असलेले डॉक्टर्स स्वतः करणार आहेत. सायं.5:30 ते 8:00 वाजेपर्यंत रुद्रपूजा, सत्संग होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.तरी सर्वांना आर्ट ऑफ लिविंग अहमदनगर शाखेकडून आवाहन करण्यात येते की या संधीचा नाव नोंदणी करून आवश्यक लाभ घ्यावा.
ठिकाण.
आर्ट ऑफ लिविंग,ज्ञान क्षेत्र,गावडे मळा,पाईपलाईन रोड,सावेडी,अहमदनगर.