देशाचे नव्हे तर विश्वाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी - तिरतसिंह रावत.

Ahmednagar Breaking News
0

देशाचे नव्हे तर विश्वाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी - तिरतसिंह रावत.

वयोश्री योजनेत देशात नगर जिल्ह्याचा रेकॉर्ड. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

अहमदनगर,प्रतिनिधी. (24. मे.) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता आपल्या भारताचे नेते राहिले नसून विश्वाचे नेते झाले आहेत, महासत्ता असलेले देश सुद्धा मोदींचे नेतृत्व आता मान्य करत असल्याचे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा पक्ष निरीक्षक तिरतसिंह रावत यांनी सांगून येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात परत भाजपाचेच सरकार येणार यात कुठलीच शंका नाही असे सांगितले.अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात भाजप पक्षाच्या आमदार, खासदार, तसेच पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होहून ९ वर्षे झाली या निमित्ताने भाजपने ३० मे ते ३० जुन या कालावधीत जन संपर्क अभियान राबविण्याचे ठरविले असून याचा आढावा आणि त्या दृष्टीने पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिरत सिंह रावत आणि मध्यप्रदेशचे पर्यटन विभागाचे अध्यक्ष विनोद जी गोटीया यांनी एक बैठक घेतली. 

यावेळी बोलताना रावत म्हणाले की मागील नऊ वर्षात देशात खूप धाडसी निर्णय घेण्यात आले ,तसेच काही ऐतिहासिक निर्णय देखील घेतले ज्यामुळे देशात स्वतंत्र मिळाल्या पासून रखडलेले विषय हे निकाली निघाले, एवढंच नाही तर अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पासून कोणीच वंचित नाही राहिला , मात्र विरोधक विरोधाचे काम करताना राजकीय मूल्यांचे हवण करत असल्याचा आरोप करत सर्वसामान्यांच्या मनात मोदीजी यांच्या विषयी अत्यंत आदर आहे. मोदी यांच्या बद्दल आता फक्त भारतातच नाही तर विश्वात आदराची भावना आहे.अनेक महासत्ता देश हे मोदींना नेते मानत असून त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. आणि याचाच विरोधकांत पोटशूळ उठला असून  त्यामुळे ते एकत्रित येवून विरोध करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

विनोद गोटीया यांनी आपल्या भाषणातून सांगितले की आज देशातील गरीब, मजदुर, वंचित हे कोरोणा सारख्या काळात उभे राहिले याचे एकमेव कारण पंतप्रधान मोदी हेच असून त्यांनी या काळात मोफत राशन दिले एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी दरमहा मदतीचा हात म्हणून पैसे देखील दिले. या बरोबरच कोरोनाची मोफत लस देखील दिली. आपल्या देशात तयार झालेली लस ही इतर देशाला देखील दिल्याने विश्वात आपल्या देशाचा डंका सध्या वाजत आहे. यासर्व बाबी लक्षात घेवून ग्रामीण भागातील शेवटच्या माणसा पर्यंत ही बाब नेण्यासाठी जन संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान कशा पद्धतीने राबवायचे या करिता या बैठकीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

या बैठकीत बोलताना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आपल्या जिल्ह्यासाठी करोडो रुपयांचा निधी देवून जिल्ह्याचा कायापालट केला. यात प्रामुख्याने रस्ते, सिंचन, वयोश्री योजना याचा समावेश आहे.देशात आपल्या जिल्ह्याचा वयोश्री योजनेत रेकॉर्ड झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  जन संपर्क अभियानाने एक नवी ऊर्जा मिळणार असून पक्षीय पातळीवर जी जवाबदारी दिली जाईल ती पूर्ण करण्यासाठी आपण कायम तत्पर आहोत असे सांगितले.यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष महेन्द्र गंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीस भाजपचे पदाधिकारी, तालुका प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top