स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके व मार्गदर्शन महत्त्वाचेच. - UPSC उत्तीर्ण महारुद्र भोर.
अहमदनगर येथील पृथ्वी फाउंडेशन संचलित मास्टर माईंड अकॅडमी तर्फे पोलीस भरती झालेल्या गुणवंताच्या सत्कार समारंभ व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे होते. तर, व्यासपीठावर प्राचार्य सोपान निंभोरे, प्रा.श्याम सांगळे, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, डॉ. प्रदिप चोभे, प्रा.संतोष ठुबे, दादास घोडके, बंकट परकाळे, सिद्धनाथ मेटे महाराज, जालिंदर सायंबर आदी उपस्थित होते.महारुद्र भोर म्हणाले, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून यूपीएससीची तयारी करीत होतो. त्यासाठी काही दिवस दिल्लीलाही राहिलो. अभ्यास करीत असताना मी ठरवून घेतले होते की ज्यावेळी अभ्यासात मन लागेल त्याच वेळी अभ्यास करायचा. मी जवळपास पाच ते सहा वेळा परीक्षा दिली. तसेच तीन वेळा मी मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो. साधारण तीन ते चार गुणांनी मला अपयश मिळाले. परंतु त्या अपयशाने खचून गेलो नाही किंवा हाताशही झालो नाही. मी शेवटपर्यंत धैर्य सोडले नाही आणि म्हणूनच मला यश मिळाले. अनेक वेळा अपयश मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी मला अन्य क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी आहे असे सांगितले. परंतु, मी माझ्या ध्येयावर ठाम राहिलो आणि त्यामध्ये सातत्य ठेवले. अभ्यास करत असताना नेमकी कुठली पुस्तक वाचावीत आणि कोणती पुस्तके वाचू नयेत हे समजने खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
पोलीस भरती झालेल्या माझ्या बांधवांना विनंती करतो केवळ पोलीस सेवेवरच न थांबता एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा देऊन उत्तम यश मिळावे. काही अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा.प्राचार्य सोपान निंभोरे म्हणाले, समाजात विविध क्षेत्रांमध्ये आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींचा आज राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. प्रशासकीय सेवेत नोकरी लागली तर तिचा उपयोग समाजासाठीच करायचा असतो अशी काही उदाहरण आजही समाजात दिसून येतात, अशाच गुणवंतांचा इतिहास सत्कार करण्यात आला हा सत्कार म्हणजे नव्या लढाईसाठी प्रेरणा आहे.
यावेळी डॉ. प्रदिप चोभे, पुरस्कारार्थी प्रा.डॉ.सज्जन गायकवाड, प्रा.डॉ.राम बोडखे, डॉ.नारायण गवळी, दळवी सर, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, डॉ. सूर्यकांत वरकड यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, पोलीस भरती झालेल्या गुणवंतानेही आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमासाठी पिंपळे सर, संतोष उंडे सर, बाळासाहेब खेडकर, राम गव्हाणे, बेरड सर, सांगळे सर सर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये पृथ्वी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मास्टर माईंड अकॅडमीचे संचालक प्रा. अमोल सायंबर यांनी पृथ्वी फाउंडेशनच्या व व मास्टर माईंड अकॅडमीच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी प्रा. सुळ यांनी आभार मानले.
राज्यस्तरीय पुरस्कारार्थी.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रा. सज्जन गायकवाड, प्रा. डॉ .नारायण गवळी, हरिश्चंद्र दळवी सर यांना राष्ट्र निर्माता पुरस्कार देऊन सन्मानित केले. प्रा. रामकृष्ण बोडखे यांना पर्यावरण मित्र, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना कर्तव्यदक्ष अधिकारी तर दै. पुढारीचे उपसंपादक डॉ. सूर्यकांत वरकड यांना शोध पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.