शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी शहरातील विविध भागात 185 सीसीटीव्ही कॅमेरे.
नगर, प्रतिनिधी.(23. जून.) : आज अहमदनगर येथील पोलीस अधिक्षक कार्यालय येथे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी कंट्रोल रूमची प्रत्यक्ष जावून पाहणी केली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेमो घेतला.यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला हे उपस्थित होते.शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी 185 सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्यात आले असून मागील 15 दिवसापासून याची चाचणी सुरू केली आहे. तसेच शहरातील 51 चौकातील वाहतुकीचे नियंत्रण आता कंट्रोल रूम मधून होणार आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.