ॲड.धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धीबागेत उसळला बालगोपाळांचा महापूर.
नगर, प्रतिनिधी. (14. जून.) : अहमदनगरच्या शहरातील प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक सिद्धीबागेत रविवारी दि. ११ जून रोजी हजारो बालगोपाळांचा अक्षरश: महापूर उसळला.युवक नेते, माजी नगरसेवक, सामाजीक कार्यकर्ते ॲड.धनंजय भैय्या जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिद्धीबागेत भव्य बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित हजारो बालगोपाळांना पूर्णपणे मोफत रेल सफर, अंपींग जंप, मिकी माउस, ब्रेक अन्स, घोडे सवारी, पाळणा, अन्य मासा घर था खेळांबरोबरच भेळ, पाणीपुरी, रगडापूरी, चॉकलेट, पॉपकॉर्न आदींचा उपस्थितांनी मजमूराद आनंद लुटला..यावेळी खेळ खेळताना व खाऊ खाताना बालगोपाळांच्या चेहऱ्यावर आनंद, व समाधान अक्षरशः ओसडून वाहत होता.या प्रसंगी केक कापून, हवेत फुगे सोडून, फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठया जल्लोषात ॲड. धनंजय जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात श्री जाधव हे साई द्वारका ट्रस्ट आदी संस्थाच्या माध्यमातून करीत असलेल्या आरोग्य विषयक उपक्रम, सामाजीक उपक्रमाचे तोंड भरून कौतूक केले.हजारो बालगोपाळांबरोबरच उपस्थित अबाल वृद्ध, विविध राजकीय, सामाजीक, धार्मिक, शैक्षणीक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महीला भगिनी व सर्वच स्तरातून ॲड.धनंजय जाधव यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छां दिल्या.यावेळी राजूमामा जाधव, दिनानाथ जाधव, राहुल मुथ्या, संजय बोगा,अभिमन्यु जाधव,चैतन्य जाधव, स्वप्नील दगडे,शुभम काकडे, आदिनाथ जाधव सोमनाथ जाधव, , ज्ञानेश्वर दौड़कर, शिवदल पांढरे, पुरुषोनाम सब्बन,स्वप्निल अंकम,तुकाराम रामगिरी, मोहसीन शेख,आदीत्य जाधव,अशोक फलके,सचिन महादर आदी उपस्थित होते.