एका वर्षात राज्यात विकास कामांचा धडाका.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
अहमदनगर,प्रतिनिधी. (30. जून.) : राज्यात भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार एक वर्षा पूर्वी सत्तेत आल्यावर सर्वत्र विकास कामाचा धडाका सुरू असून मागील तीन वर्षात अडकलेला विकास आता सर्व पातळीवर जोमाने सुरू असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की,अहमदनगर जिल्ह्याला तर या एक वर्षात भरभरून मिळाले असून यात दोन वर्षानुवर्षे रखडलेल्या उपसा जलसिंचन योजना आहेत, या योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत शब्द दिला की आम्ही पूर्ण करू आणि त्यांनीच माविआ सरकार पडल्यावर पुन्हा सत्तेत येताच या योजना कार्यान्वित केल्या तसेच रस्ते, जल जीवन मिशन या सारख्या अनेक लोक कल्याणकारी योजना एक वर्षात अहमदनगर मध्ये मोठ्या प्रमाणावर आणल्या , यात काही सुरू झाल्या तर काही पुढील तीन चार महिन्यात पूर्ण होतील असे सांगितले.यावर्षी आषाढी एकादशीचे नियोजन अत्यंत चोख करण्यात आले. या चांगल्या नियोजनामुळे वारी अभूतपूर्व ठरली असे त्यांनी सांगून वारकऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आमच्या सरकारने विश्वास संपादित केला आहे असे सांगितले.कायदा व सुव्यवस्था बाबत विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना खा. विखे म्हणाले की नगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरण गढूळ बनविण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत, ते तपासात निष्पन्न होतीलच परंतु आम्ही गृह विभागाचे अपग्रेडेशन करत आहोत, नगर शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून आता गुन्हेगारीस नक्कीच आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून जिल्ह्यास एक समान निधीचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगताना विरोधक करत असलेल्या आरोपात तथ्य नाही असे सांगितले. मागील तीन वर्षाच्या कालावधीत भाजपाच्या आमदारांना केवळ दोन अंकी संख्येत निधी मिळाला मात्र आम्ही सर्वांना एक समान न्याय देण्याच्या भूमिकेने सगळ्यांना निधीचे वाटप केले. विरोधकांनी पुरावे देवून आरोप करावे असे यावेळी आवर्जून सांगितले.सुडाचे राजकारण विखे पाटील कुटुंबांनी कधीच केले नाही आणि करणार पण नाही असे सांगून विरोधक द्वेषापोटी सध्या आरोप करताना दिसत आहेत असे सांगितले.गृह विभागाच्या नियोजित निवासस्थाना बाबत काम प्रगती पथावर असून शिर्डीचे निवासस्थान तयार झाले आहे, दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी निधी प्राप्त झाला की भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.अहमदनगर मनमाड रस्त्याचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम पूर्ण होईल असे सांगून उड्डाणपुलाच्या काही तक्रारी असतील तर त्या संबंधी ठेकेदारास सूचना करून पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. सर्वसामान्यांसाठी आपण काम करत असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध आहोत असे सांगितले.