डॉ.विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयास नाशिक महसूल विभागातील "सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय"पुरस्कार.
नाशिक, प्रतिनिधी. (10. जून.) : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २५ व्या स्थापना वर्षानिमित्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ श्रीमती भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ श्रीमती अरुणा वनीकर, अध्यक्ष, पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळ, राष्ट्रीय विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित रौप्य महोत्सव निमित्ताने अहमदनगर येथील डॉ विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयास नाशिक महसूल विभागातील "सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार संस्थेच्या वतीने संचालक (वैद्यकीय) प्रा. डॉ. अभिजित दिवटे व महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.डॉ. सुनील म्हस्के यांनी स्विकारला. याप्रसंगी म.आ.वि. वि. कुलगुरू ले. जन.(नि.) डॉ माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई चे संचालक व माजी कुलगुरू प्रा.डॉ.दिलीप म्हैसेकर, म.आ.वि. वि. चे सर्व माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, डॉ नीलिमा क्षीरसागर, डॉ अरुण जामकर तसेच म.आ.वि. वि.चे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू हेही उपस्थित होते.
तरी सदर पुरस्काराबद्दल संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष मा.नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील , मंत्री, महसूल, दुग्ध व्यवसाय विकास व पशुसंवर्धन,महाराष्ट्र राज्य तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विश्वस्त खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी सर्व अधिकारी, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ...