जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांच्या विविध प्रश्नांसाठी शिक्षक आमदार दराडे आणि शिक्षण उपसंचालक यांच्यात सहविचार सभा.

Ahmednagar Breaking News
0

जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षण उपसंचालक व शिक्षक आमदार दराडे यांची प्रश्‍न मार्गी लावण्यास सकारात्मक भूमिका.

नगर, प्रतिनिधी.(27. जून.) : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांच्या विविध प्रश्‍नांबाबत पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये सहविचार सभा पार पडली. या बैठकीत विविध प्रश्‍नांवर चर्चा करुन स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न तातडीने सोडविण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी उपस्थित शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध प्रश्‍न उपस्थित केले.या बैठकीसाठी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनिल पंडीत, उपाध्यक्ष प्रा.मिथुन डोंगरे माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे,सचिव रमजान हवलदा प्रा.संभाजी पवार, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे  प्रा. बाळासाहेब कळसकर, प्रा.सुनिल सुसरे, शिक्षक युवा नेते वैभव सांगळे,खाजगी प्राथमिक संघटनेचे विठ्ठल उरमुडे, शेखर उंडे सर , निलेश बांगर, अरुण तुपविहीरे, प्रा. जमीरभाई शेख, तौसिफ शेख,  घोषित  अघोषित शिक्षक संघटनेचे रवींद्र गावडे सर आदींसह शिक्षक, वेतनपथक व सिनियर ऑडीटर कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.शिक्षकांवर दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये समाजातील विविध घटकांकडून होणारा प्राणघातक हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, परीक्षेचे पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना पुरेसे संरक्षण मिळावे,अर्धवेळ ग्रंथपाल यांना पूर्णवेळ ग्रंथपाल करण्याचे शासन परिपत्रक निघालेले असताना त्याबाबत कारवाई करण्याची मागणी देखील या बैठकीत लाऊन धरण्यात आली.माध्यमिक शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये, मागील दहा वर्षापासून थकित असलेले जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे पेपर तपासणीचे मानधन व पेपर मॉडरेशनचे मानधन मिळावे, नवीन शैक्षणिक धोरणाबाबत माहिती शाळा स्तरावर कळविण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन पथक कार्यालयात बदली झालेल्या कर्मचार्‍यांच्या जागेवर अद्याप कोणाचीच नियुक्ती झाली नसल्याने या विभागाचा कारभार रामभरोसे सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच सीनियर ऑडिटर कार्यालयातील प्रश्‍न व इतर वैयक्तिक प्रश्‍नांवर यावेळी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरिष मुंडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top