मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी खा.विखे यांना खांद्यावर घेऊन केला नाच.

Ahmednagar Breaking News
0

३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनी खा. विखे यांचे वाद्यवादन.कार्यकर्त्यांनी खा.विखे यांना खांद्यावर घेऊन नाच केला.

जामखेड,प्रतिनिधी. (03. जून.) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्यां शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने जामखेड येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत ढोलताशा वाजविला,या बरोबरच लेझिम देखील खेळली. कार्यकर्त्यांचा या मिरवणुकीत एवढा उत्साह होता की त्यांनी खा.विखे यांना खांद्यावर घेवून नाच केला. जय भवानी जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यावर सुजय विखे यांनी भगवा झेंडा हाती घेवून तो फडकवला. 

जामखेड येथील शिवराज्याभिषेक सोहळा दिन जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा होत असताना मुलींनी साहसी खेळ केले तर मुलांनी मल्लखांब वर चित्तथरारक कसरती केल्या. या मिरवणुकीत जामखेड सह पंचकृशितील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top