नगर मधील RJ गिरीराज जाधव यांनी गायलेल्या " माझ्या कानड्या विठ्ठला "या गाण्याचं आज प्रमोशन.
नगर, प्रतिनिधी. (29. जून.) : सिद्धी ढोके लिखित आणि संगीतकार - गायक गिरीराज जाधव यांनी गायलेल्या " माझ्या कानड्या विठ्ठला " या गाण्याचं आज गुलमोहर रोड, सावेडी येथील विठ्ठल मंदिरात गायन सेवा देऊन हे गाणं विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आलं.ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग पुणे येथे सत्यजित केळकर यांच्या स्टुडिओमध्ये करण्यात आले असून त्यांनीच या गाण्यासाठी संगीत संयोजक म्हणून काम पाहिले आहे.आज येथील विठ्ठल मंदिरात गिरीराज जाधव यांनी त्यांच्या गाण्याचं आणि बाकी भजनांचं गायन केलं तेव्हा विठुरायाच्या नामस्मरणात भक्त तल्लीन झाले होते.
हे गाणं तुम्ही युट्यूब वर अध्यात्म आधार (Adhyatm Aadhar) या चॅनल वर ऐकू शकता. तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन गिरीराज जाधव यांनी केले आहे.