पशुसंवर्धन विभागात आता गुणात्मक स्तरावर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.- मंत्री विखे पाटील.
नगर, प्रतिनिधी. (02. जुलै.) : पशुसंवर्धन विभागात आता गुणात्मक स्तरावर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.नव्या धोरणातून विभागाची लोकाभिमुखता वाढविण्यासाठी बदलांचा स्विकार करून गुणवतेनेच कामाचा दर्जाही उचंवावा लागेल अशी अपेक्षा महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
लम्पि साथ रोगाच्या संकट काळात सरकारी आणि खासगी पशुवैद्यकीय अधिकार्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कृतज्ञता व्यक्त केली.खा.डॉ सुजय विखे पाटील,जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले,विभागाचे आयुक्त डॉ हेमंत वसेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,अतिरीक्त आयुक्त डॉ शितल कुमार मुकणे,डॉ बाबुराव नरवडे,उपवन संरक्षक सुवर्णा माने,जिल्हा उपायुक्त डॉ सुनिल तुंभारे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ मुकूंद राजाळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की,सर्वात महत्वाचा विभाग असला तरी यापुर्वी मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले.पण राज्य सरकारने या विभातील बदलांना सुरूवात केली असून पशु चिकीत्सालया पासून ते उपचारासाठी आवश्यक असलेल्या साधन सुविधांची उभारणी नव्याने करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.लम्पि संकटात कोव्हीड योध्दे म्हणून सर्वानी केलेल्या कामाचे कौतुक करून सर्वाच्या सहकार्याने थोपवू शकलो. यासाठी राज्य सरकारने मोफत लसीकरण आणि औषधांचा खर्च करून गोपालकांना मोठा दिलासा दिला.विभागाने केलेल्या उपाय योजनांचा स्विकार देशाने केला.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्र राज्य पशुधन वाचविण्यासाठी आघाडीवर राहीले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.आज पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दुध उत्पादकांना दिलासा देणारे होत आहेत.देशी गोवंशाच्या गायीची पैदास वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.दूध भेसळ रोखण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आपलेही सहकार्य अपेक्षित असल्याचे स्पष्ट करून राज्यात प्रथमच शेळी मेंढी सहकारी महामंडळाची स्थापना करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होईल.कृषी विज्ञान केंद्राच्या धर्तीवर पशु विज्ञान केंद्राचा प्रयोग राज्यात प्रथमच होत असून पहीले केंद्र नगर जिल्ह्य़ात सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात आता खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे तसेच पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
खा.डॉ सुजय विखे पाटील यांंनी आपले मनोगत व्यक्त करताना पशुसंवर्धन विभागातील बदलांचा स्विकार करून जिल्ह्यातील पशुवर होणारे आजार करण्यात येणाऱ्या उपचारांची माहीती उपचार पुस्तिकेची आवश्यकता असल्याचे सांगितले.पशुसंवर्धन विभागाला विद्यत चलित मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली.आपल्या कामाच्या माध्यमातून आपुलकी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पशुचिकीत्सक उपस्थित होते.