श्री.सद्गुरु शंकर महाराज.कल्पतरू मठ,कल्याण रोड येथे असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न.
नगर,प्रतिनिधी. (05. जुलै.) : श्री सद्गुरु शंकर महाराज. कल्पतरू मठ, कल्याण रोड येथे दरवर्षी प्रमाणे श्री.कृपेने दिनांक ३जुलै२०२३ रोजी गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम असंख्य भाविकांच्या उपस्तिथीत भक्तीभावाने संपन्न झाला.सकाळी ६ वा.रुद्राभिषेक करून त्यानंतर सकाळी ७:३० वा.आरती करण्यात आली. सकाळी १० ते १२ वा. पर्यंत ह.भ.प. राधेश्याम महाराज कुलकर्णी यांचे कीर्तन आणि सौ.श्रद्धा टिंगरे यांचे भजन कार्यक्रम संपन्न झाला.दुपारी १२ वा.महाआरती करण्यात आली. दुपारी १२:३० ते ३ वा पर्यंत महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.दुपारी ४ ते ५ कु. रिद्धी अद्वैत कुलकर्णी यांचा अभंग कार्यक्रम संपन्न झाला.
सायं ५:३० वा. श्रींची पालखी मिरवणूक भाविकांच्या उपस्थितीत परिसरातून काढण्यात आली, मिरवणुकीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.सायं ६:३० वा. महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद नियोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रमांचा मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी लाभ घेतला असे अंबादास नरसाळे यांनी ABN शी बोलताना सांगितले.यावेळी राजाभाऊ धर्माधिकारी गुरुजी, विजय मर्दा, उंडे नाना उपस्थित होते.
श्री.सद्गुरु शंकर महाराज.कल्पतरू मठ, कल्याण रोड, अहमदनगर.