भारताचे चंद्रयान 3 यशस्वी, इस्रोची ऐतिहासिक कामगिरी.नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष.
नगर, प्रतिनिधी. (23. ऑगस्ट.2023.) : जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कोरले आहे.चांद्रयान 3 यशस्वीपणे उतरले असून भारत देशामध्ये मोठा आनंद उत्सव साजरा केला जात आहे. भारत देशाने जगाच्या पाठीवर आजच्या युवा पिढीसमोर इतिहास रचला आहे.चांद्रयान 3च्या माध्यमातून चंद्रावरील सर्व सखोल माहिती जगासमोर येणार आहे.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील खूप कमी माहिती जगाकडे आहे.चांद्रयान 3 या मिशनमुळे भारताला चंद्राच्या दक्षिण धुव्रारील मोठी माहिती मिळेल.त्यामुळे भारत देशाचे जागतिक पातळीवर मोठे बलस्थान निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने चांद्रयान 3 ची यशस्वी चाचणी झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रा.अरविंद शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे,वैभव ढाकणे,योगेश नेमाने, साधना बोरुडे,अमित खामकर, माऊली जाधव,भरत गारुडकर,उमेश धोंडे, विशाल बेलपवार,स्वप्नील भोरे, निलेश इंगळे,अब्दुल खोकर,शानवाज शेख,शाहरुख शेख,ऋषिकेश बागल,प्रांजल खाकाळ,समीर भिंगारदिवे,जितेंद्र बनकर आदी उपस्थित होते.