!! ओम नमः शिवाय.!!
श्रावण महिन्यानिमित्त महादेवाच्या मंदिरात श्री.सत्यनारायण महापूजेचे आणि महाप्रसादाचे आयोजन.
नगर, प्रतिनिधी. (25.ऑगस्ट.2023.) : भिस्तबाग चौकातील जगदंबा क्लॉथ स्टोअर मागील श्री.छत्रपती कॉलनी मधील सांस्कृतिक भवनात असलेल्या महादेवाच्या मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त श्री.सत्यनारायण महापूजेचे आयोजन सोमवार 28.ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले आहे.तसेच श्रावण महिन्यानिमित्त महादेवाच्या उत्सवासाठी ज्ञानमाऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम 29.ऑगस्ट.2023 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी 1:00 ते 4:00 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.