शहरातील मोकाट कुत्रे आणि डुकरापासून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत मा.नगरसेवक निखिल वारे यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट.
नगर, प्रतिनिधी.(10.ऑगस्ट.2023.) : आज मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांची भेट घेऊन शहरातील मोकाट कुत्रे आणि डुकरापासून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असुन त्यावर अकोला मनपाच्या धर्तीवर तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी मा.नगरसेवक निखिल वारे यांनी केली व कोरे लेटर पॅड देऊन निषेध व्यक्त केला.यावेळी नगरसेवक सुनिल त्रिंबके, बाळासाहेब पवार हे उपस्थित होते.