जिल्हा मराठाच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी आर्थिक गुन्हेशाखेच्यावतीने करावी. : उद्योजक अमोल गाडे.

Ahmednagar Breaking News
0

उद्योजक अमोल गाडे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज दाखल करत केली मागणी.

नगर,प्रतिनिधी. (18. ऑगस्ट.2023.) : काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या बाबतीत वर्तमानपत्रातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे विश्वस्तांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर वाद उपस्थित झाला, त्यामुळे १९ पैकी १४ विश्वास्थांनी तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांच्यावर ४ ऑगस्ट २०२३ रोजी अविश्वासाचा ठराव दाखल केला,अशी बातमी दैनिक नगर सह्याद्री या वृत्तपत्रात दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी छापून आली व ४ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात मतदान घेण्यात आले त्यावेळी १९ विश्वस्थ उपस्थित होते अशी बातमी दैनिक पुढारी या वृत्तपत्रात दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी छापून आली.वरील दोन्ही वृत्तपत्रांच्या कात्रणा मधून असे स्पष्ट दिसून येते की, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती मध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे, तरी वरील सर्व प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेमर्फत गुन्हा (FIR) दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, माझे आजोबा स्व. बाबुराव यशवंतराव गाडे हे या संस्थेचे विश्वस्थ होते, तसेच संस्थेच्या विकासासाठी व समाजातील गोरगरीब विध्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी  आमच्यासहीत अनेक परिवारांनी आर्थिक स्वरूपात देणगी व स्वमालकीचे  अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील भूखंड अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेस दिले आहे. झाल्या प्रकाराने संस्थेची आणि मराठा समाजाची अवहेलना होत आहे त्यामुळे मी व्यथित झालो आहे.वरील प्रकरणात गरज पडल्यास मी फिर्यादी होण्यास तयार आहे. मी आपणांस कळकळीची विनंती करतो की वरील प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उद्योजक अमोल गाडे यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करत केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top