आत्मनिर्भर भारताने महासत्तेचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले. - नामदार विखे पाटील.
शिर्डी,प्रतिनिधी.(23. ऑगस्ट.2023.) : अवघ्या जगाचे लक्ष वेधणारी अत्यंत महत्वाची असलेली चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करून भारताने जगाबरोबरच आता चंद्रावरही छाप पाडली आहे. चांद्रयान मोहीमेचे यश हे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कर्तबगारीचा मोठा अविष्कार असून, विश्वनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताने महासतेचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होणे ही सर्व भारतीयांसाठी मोठी घटना आहे. जगातील अमेरीका रशिया आणि चीन या देशांबरोबरच आता भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी करणाऱ्या देशाच्या यादीत स्थान मिळवले आहे.याही पलीकडे जावून दक्षिण ध्रृवावर चांद्रयान उतरविणारा भारत देश पहीला ठरल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे यशस्वी प्रयत्न बलशाली भारताची ओळख निर्माण करून देण्यास कारणीभूत ठरल्याने मंत्री विखे पाटील यांनी चांद्रयान मोहीमेच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेणार्या वैज्ञानिक आणि टिमचे अभिनंदन केले आहे.सप्टेंबर २०१९ चांद्रयान मोहीमेत अपयश आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या टिमला पुन्हा पाठबळ देवून ही ऐतिहासिक कामगिरी यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सर्व शास्त्रज्ञांच्या सामुहीक प्रयत्नामुळे देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रगती आणि विकासाच्या माध्यमातून जगात वेगळी प्रतिमा निर्माण केल्यानंतर आता चांद्रयान मोहीमेचा विक्रम भारत देशाच्या नावावर नोंदला गेला आहे.आत्मनिर्भर भारत आता महासतेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे, हे सांगण्यासाठी आता कोणत्याही ज्योतीषाची आणि इतर कोणत्याही देशाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. इतर देशाच्या तुलनेत भारत देश आता लष्करी सामर्थ्यामध्येही बलशाली होत असल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे. ९ वर्षात केंद्र सरकारने देशहितासाठी घेतलेल्या निर्णयामुळेच आता जगात भारताचे महत्व आजच्या ऐतिहासिक घटनेमुळे आधोरेखित झाले असल्याचे मंत्री विखे यांनी आवर्जून नमूद केले.