रक्षाबंधन निमित्त सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी समाजात जागृती व्हावी यासाठी आपल्या बहिणी बाबत लिहिलेला लेख.....
ताई तुस्सी द ग्रेट...
नगर, प्रतिनिधी.(29.ऑगस्ट.2023.) : आम्ही चार भाऊ व एक बहीण, ती सर्वात लहान कोरोना मध्ये आई आमची अचानक निघून गेली आमच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळ ले. या मधून सावरणे अवघड होते परंतु त्या कठीण काळात ही आमचे सर्व कुटुंब कसे बसे सावरण्याचा प्रयत्न केला त्या मध्ये ताई सर्वात लहान असूनही तिने आम्हाला सावरण्यात सिंहाचा वाटा उचलला. खरे पाहता सर्वात मोठे दुःख तिला झाले हे नंतर आम्हाला कळले परंतु तिने त्याची किंचितशी जाणीव होऊन दिली नाही, कारण रोज दुपारी आई तिला फोन करत होती ती कित्येक वर्षांपासून ती सर्व कौटुंबिक सुख दुःखाच्या गोष्टी तिच्या बरोबर वाटून घेत होती, त्या मुळे ताई पुण्यात असून तिला सर्वकाही कळत होते आणि आमच्या भावात काही त्रुटी असल्यास ती नकळत आम्हाला लहान असूनही समजावून सांगत असे.आई गेल्या नंतर दोन वर्षेही नाही झाले वडील आजारी पडले. त्यांना नगर येथून पुण्यात रुबी हॉस्पिटल नंतर केईएम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.तो क्षण आमच्या आयुष्यातील फार मोठं संकट आमच्या कुटुंबावर आलेले वडिलांना ऍडमिट केल्या नंतर कुठे राहायचं, कुठे खायचं, आर्थिक संकट कसे दूर करायचं असे अनेक प्रश्न आमच्या समोर उभे होते. पण ताई ने एखाद्या मोठया भावाने धीर द्यावे तसे तुम्ही उभे राहा मी आहे तुमच्या बरोबर असे म्हणून तिने आम्हा तिघा भावना त्यांचे सर्व कुटुंबाला फार मोठे आश्रय दिले.आम्ही तिघे भाऊ व आमचे सर्व कुटुंब ताई कडे राहत होतो एक दोन दिवस नव्हे तर चक्क दोन तीन महिने,, या काळात आम्ही 1-2 नव्हे तर लहान मोठे 12 जण राहत होतो. इतक्या लोकांचे सकाळ चा चहा नाश्ता पासून दुपार रात्रीच जेवण इतक सर्वकाही सोपं नव्हतं पण कधी ताई ने हे अवघड आहे असे दाखवले नाही. विशेष म्हणजे आमचे भावजी संदीप यांनी सुद्धा त्या काळात आपला संपूर्ण व्यवसाय बंद करून आमच्या खांदाला खांदा देऊन उभे राहून सर्वोतोपरी सहकार्य त्यांनी आम्हाला केले, त्या मुळे त्यांचे बद्दल चा आदर ही आम्हाला अगोदर पेक्षा जास्त वाढला.एकीकडे वडिलांचा दवाखाना चालू होता लाखो रुपये खर्च चालू होता वडिलांची तब्येत अप अँड डाऊन होत या सर्व परिस्थिती मध्ये ताई तीचे दिवसभर चे जॉब करून वेळ मिळेल तसे दवाखान्यात येऊन घरी कोणतीही गोष्ट कमी पडून देत नव्हती, इतकेच नाही तर अनेक वेळा औषधाना पैसे देऊन ही न दिल्याचे भास दाखवत होती. जर तिला आपण काही विचारले तर फक्त म्हणत असे मी पण त्यांची मुलगी आहे माझी पण जबाबदारी आहे इतकेच बोलत होती. नाही तर आपण पाहतो मदत करणे कमीच पण आपल्याला काय मिळेल या स्वार्थ बुद्धीने अनेक जण वावरताना दिसतात, शेवटी तर तिने आपले सोने विकून औषधोपचाराचे नियोजन करण्याची तयारी दर्शवली व ही गोष्ट आम्हाला दुसरी कडून कळल्या नंतर मन भरून आले या बाबत तिला विचारणा केली तर तिचे एकच उत्तर माझी पण जबाबदारी आहे दादा, तुम्ही किती खर्च करणार मलाही करू द्या, त्या वेळेस आम्ही तिला सांगायचो आम्ही थकलो की सांगू. या वेळेस माझा लहान भाऊ अमेरिकेतून एक दोन नाही तीन वेळेस वडिलांच्या काळजी पोटी आला, नुसते आलाच नाही तर त्याने सुद्धा वडिलांच्या औषधोपाचाराची सर्व जबाबदारी उचलली त्याचा सुद्धा फार हेवा वाटलं नाही तर आपण पाहतो परदेशात गेलेली व्यक्ती आपली सर्व जबाबदारी विसरून स्वार्थ वृत्तीने वावरत असल्याचे अनेक उदाहरणं पाहतो, पण त्याने कोणत्याही खर्चाची परवा न करता अभेद्य उभा राहून सर्व गोष्टीत्त सिंहाचा वाटा उचलून कार्य केले. खरंच लहान असूनही मोठयाला लाजवल असे काम त्याने केले.नंतर वडीलही सोडून गेले आम्ही भाऊ बहीण पोरके झालो परंतु आई वडिलांच्या इच्छे नुसार आजही आम्ही चौघे भाऊ बहीण एकदिलाने राहतो व बहीण -ताई आजही आमची इतकी काळ्जी घेते की आम्हाला आई वडिलांची जाणीव होऊ न देता तिचे कुटुंब सांभाळून आमच्या कुटुंबाचीही काळजी घेते म्हणून म्हणतात बहीण एक अनोखं नातं आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
हा लेख लिहिण्यमागे एकच उद्देश आहे ताई कशी असावी ब भाऊ कसा असावा तर असे या दोघांनाही माझा सलाम!म्हणून आवर्जून म्हणावं वाटत "ताई तुस्सी द ग्रेट."