दिव्यांगाना नवे आयुष्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

दिव्यांगाना नवे आयुष्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

नगर,प्रतिनिधी. (16.सप्टेंबर.2023.) : दिव्यांग बंधू भगिनींना विनामूल्य साधन साहित्य देवून एक नवीन आयुष्य दिले असून ते आता समाजात सन्मानाने जगू शकतील असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येस ही भेट त्यांनी तुम्हाला पाठवली असल्याचे सांगितले.

अहमदनगर येथे दिव्यांगाना विनामूल्य साधन साहित्याचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ॲडीप योजने अंतर्गत नगर तालुक्यातील जवळपास एक हजार दिव्यांगाना या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले,अहमदनगरचे आ.संग्राम भैया जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी जिल्हाध्यक्ष महेन्द्र गंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना ते म्हणाले की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिलेच नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी दिव्यांगाच्या बाबतीत विचार करून त्यांच्यासाठी योजना आणली. या योजेनेअंतर्गत दिव्यांगाना त्यांचे दैनंदिन जीवन जगतांना येणाऱ्या अडचणींवर मात करून सर्वसामान्य व्यक्ती सारखे स्वयंपूर्ण आयुष्य जगता आले पाहिजे . यासाठी लागणारे साधन साहित्य हे विनामूल्य देण्याचे ठरविले आणि त्यानुसार ही योजना सबंध देशात कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचा देशात सर्वाधिक लाभ हा आपल्या जिल्ह्याला झाला असून यामुळे तुमच्या या खासदारांचा सन्मान देखील झाला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यापूर्वी दिव्यांग हे  मतदाना पासून वंचित असायचे, देशाच्या राष्ट्रीय कर्तव्या पासून दूर असलेले आपले दिव्यांग बंधू भगिनीं ह्या आता या प्रवाहात येणार आहेत. त्यांना मतदाप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांनी मनापासून आभार व्यक्त करायला हवे असे सांगून देशाच्या विकास प्रक्रियेत आता दिव्यांग येत असल्या बद्दल मनापासून आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जी- 20 आंतरराष्ट्रीय परिषदेतून विश्वाचे नेते आता आपले पंतप्रधान झाले असल्याचा अभिमान आपल्या सर्वांना असून देश मोदी यांच्या नेतृत्वात महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळेच महासत्ता देशाचे नेते आपल्या पंतप्रधानास मान सन्मान देत आहे.पूर्वीच्या काळी आपले पंतप्रधान हे या महासत्ता देशाच्या राष्ट्रप्रमुखा मागे असायचे मात्र आता ही परिस्थिती बदली असून हे राष्ट्रप्रमुख आता मोदीजींच्या मागे आहेत.आज या कार्यक्रमात दिव्यांगाना जे साधन‌ साहित्य वाटप करत आहोत यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्या या मेहनती मुळेच आपणा पर्यंत हे साहित्य पोहचू शकले आहे. या सर्वांनी जी मेहनत घेवून आपल्या पर्यंत हे साहित्य पोहचवले त्या बद्दल या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विखे पाटील कुटुंबियांनी कायम जनतेची सेवाच केली असून चार पिढ्या पासून आम्ही हे सेवेचे व्रत हाती घेतले आहे. त्याचे फळ आम्हाला मिळाले असून राज्याचे सत्ताकेंद्र हे कायम आपल्या कडे राहिले आहे. आपले आशीर्वाद हे कायम आमच्या कुटुंबावर असेच राहू द्या असे सांगून आम्ही दिलेला प्रत्येक शब्द हा पूर्ण करतोच असे सांगितले.शासन आपल्या दारी या अभियानातून डोल, कूपन तसेच आवश्यक असणारे कागदपत्रे हे सर्वसामान्य जनतेला कुठलीही लाच न घेता वाटप केले आहे. जनतेचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून आम्ही सदैव काम करत आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण कार्य हे मागील नऊ वर्षांपासून अविरत सुरू ठेवले असून या कार्यास आपण ही आपला हातभार लावावा , त्याकरिता येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपलाच मतदान करण्याचा आपण सर्वांनी निर्धार करावा असे आवाहन खा.विखे यांनी केले.या प्रसंगी आ.संग्राम भैया जगताप, शिवाजीराव कर्डिले, दिलीप भालसिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खासदार, आमदार व मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगाना स्मार्ट फोन, सुगम्य काठी, व्हील चेअर, ब्रेल किट,  कुबडी, काठी, श्रवण यंत्र, सीपी चेअर, इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल, या सारखे साधन साहित्य वाटप केले.या कार्यक्रमास दिव्यांग बंधू भगिनी, त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top