श्री.विशाल आर्टस् मध्ये गणेश मूर्तिना शेवटचा हात फिरवताना कारागीर....
नगर, प्रतिनिधी. (05.सप्टेंबर.2023.) : अहमदनगरच्या गणेश मूर्तींची राज्यातच नव्हे तर व परराज्य देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. श्री विशाल आर्ट्स नावाने गेल्या पंचवीस वर्षांपासून शिंदे बंधूंनी गणेश मूर्तींचा कारखाना सुरु केला असून या कारखान्यात फक्त परिवारातील सदस्यच आकर्षक व सुबक मूर्ती तयार करायचे काम करत असतात. या कारखान्यात कुठल्याही बाहेरच्या कारागिराची गरज भासत नाही.
श्री.विशाल आर्टस् या कारखान्यात POP आणि शाडू मातीपासून सहा इंचा पासून तर पंधरा फुटापर्यंत आकर्षक व सुबक गणेश मूर्ती तयार होतात.येथील गणेश मूर्तींना चांगल्या प्रकारचे विविध रंग आणि डोळ्यात भाव दिसणाऱ्या मुर्त्या तयार केल्या जातात,त्यामुळे येथील मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या कारखान्यात होलसेल सह घरगुती ग्राहकांसाठी खास स्टॉल तयार करून या ठिकाणी विविध प्रकारच्या मुर्त्या ठेवल्या आहेत. तरी ग्राहकांनी श्री विशाल आर्ट्स.वैदवाडी,भिस्तबाग या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन शिंदे बंधून मार्फत करण्यात आले आहे.