बारादरी ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम.
नगर, प्रतिनिधी. (20. ऑक्टोबर.2023.) : नगर तालुक्यातील बारादरी ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम लागलेला असुन आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदी एकमेव व सर्व जागांसाठी तेवढेच अर्ज भरुन ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे.बारादरी ग्रामपंचायत मध्ये एक लोकनियुक्त सरपंच व सात जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर झालेलाआहे.सरपंच पद महिला राखीव असुन त्या जागेकरिता सौ.सुरेखा संजय पोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी निवड निश्चित झालेली आहे.तसेच सदस्य पदाकरिता नवनाथ बबन राठोड, द्वारका अर्जुन बडे, मंदा बाबासाहेब पोटे, शेख नौशादबी रफिक, पुजा मुरलीधर पोटे, गणेश मिठु गर्जे, नितीन बबन वाघचौरे यांचे अर्ज भरण्यात आलेले आहेत.निवडणुक बिनविरोध झाल्याने गावाच्या विकासावर याचा चांगला परिणाम होणार असुन निवडणुकीमुळे येणारी कटुता संपुष्टात येते व गावातील वातावरण खेळीमेळीचे व सौहार्दाचे राहते त्यामुळे गावामध्ये एकोपा राहतो व त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. गेल्या तीस वर्षापासुन प्रत्येकवेळी बारदरी ग्रामपंचायतची निवडणुक बिनविरोध झालेली असुन तोच पायंडा याही वर्षी पाळण्यात गावकऱ्यांना यश आलेले आहे.
सदरची निवडणुक बिनविरोध होण्याकरिता आमचे बारदरी गावचे भुषण नगर तालुक्याचे माजी सभापती सुर्यभानजी पोटे साहेब, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. युवराज भानुदास पोटे, युवानेते सुधीर पोटे, भाजपा शहरजिल्हा उपाध्यक्ष तुषारभाऊ पोटे, वि.का.से.सो चे चेअरमन रमेश राठोड सर, मा. सरपंच बबन पोटे, आसाराम पोटे,अशोक पोटे, गोकुळ तोरडमल, रामराव पोटे, मिट्टु पोटे, जाफरभाई शेख, अनिल पोटे सर, बाबासाहेब पोटे सर, सोमनाथ पोटे, राजेंद्र थोरात, सोन्याबापु पोटे, अर्जुन पोटे, गोरख वाघचौरे सर, उत्तम राठोड, सचिन जंगम, शिवाजी बडे, शिवाजी गर्जे, अर्जुन सानप, महादेव गर्जे, मन्सुर शेख, राहुल पोटे, ईश्वर पोटे, यश पोटे, शंकर गर्जे, गणेश पोटे, मधुकर चव्हाण,ओंकार जंगम आदिंनी परिश्रम घेतले व नविन सभासदांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.बिनविरोध निवडणुकीसाठी समस्थ ग्रामस्थ बारादरी व ज्ञात अज्ञात सर्व मान्यवरांचे युवानेते सुधीर भाऊ पोटे यांनी आभार मानले.