302 गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर.
नगर, प्रतिनिधी.(14.ऑक्टोबर.2023.) : अहमदनगर मधील तोफखाना पो.स्टे. येथे गु.र.नं. २८०/२०१८ चा भा.द.वि. कलम ३०२, ३६३, ३६४, ३४ व आर्म अॅक्ट कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याची थोडक्यात माहिती अशी की, मयत व्यक्ती अमोल याचे व प्रकरणातील आरोपी याची मुलगी यांचेत प्रेम संबंध होते. त्यानंतर सदर आरोपी यांनी मयत व्यक्तीस किडनॅप करुन त्यास जीवे ठार मारले.यातील आरोपी रविंद्र कचरु पंडुरे हा तब्बल ४ वर्ष फरार होता.आरोपी याचे विरुद्ध मे. कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले.आरोपीचे वतीने अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग यांनी काम पाहिले व त्यांना अॅड. अक्षय दांगट यांनी सहाय्य केले.अॅड. महेश तवले यांनी आरोपीचे वतीने युक्तीवाद करताना मे. न्यायालयाचे निदर्षणास आणुन दिले की, सदर आरोपी हा मुख्य आरोपी नसून त्याने कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही व सदर प्रकरणात जे आरोपी निर्दोष झालेले आहेत त्याचे आधारे सदर आरोपीस ग्राऊंड ऑफ पॅरीटी तत्व लागु होत आहे. त्याचप्रमाणे सरकारी वकीलांनी जामीन देऊ नये म्हणून कोर्टास विनंती केली, मात्र कोर्टाने आरोपीचे वकील अॅड. महेश तवले यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी यास जामीनावर मुक्त केले.