सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा हजारे यांचा आशीर्वाद घेऊन सन्मान करण्यात आला.
नगर, प्रतिनिधी. (02.ऑक्टोबर.2023.) : सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा राळेगणसिद्धी येथे आशीर्वाद घेऊन सन्मान करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदे चे कार्यवाह व शासनाच्या मराठी भाषा सल्लगार समितीचे सदस्य जयंत येलूलकर,शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, जेष्ठ पत्रकार संदीप रोडे, पुणे येथील जेष्ठ कवी उद्धव कानडे, राळेगण सिद्धी येथील सरपंच विजय औटी,कवी प्रा.भरत दौडकर, कवी पुरषोत्तम सदाफुले व अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले प्रत्येकाने निस्वार्थ पणे समाज उपयोगी काम करणे काळाची गरज आहे. श्रीनिवास बोज्जा यांचे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यात त्यांनी असेच कार्य करून समाजाची सेवा करावी. प्रतिकूल परिस्थिती मध्ये काम करीत असतांना बोज्जा यांनी आपल्या कार्याने समाजापुढे आदर्श निर्माण केला.यावेळी राळेगण सिद्धी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.