जालिंदर बोरुडे यांना आदर्श नेत्रसेवक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते.

Ahmednagar Breaking News
0

जालिंदर बोरुडे यांना आदर्श नेत्रसेवक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते.

अहमदनगर,प्रतिनिधी. (20.ऑक्टोबर.2023.) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना नागपूर येथील सेवा प्रतिष्ठनच्या वतीने देण्यात येणारा आदर्श नेत्रसेवक पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ आडगावकर यांनी दिली.

सेवा प्रतिष्ठनचे वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी गेल्या 30 वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत. या सेवेच्या माध्यमातून त्यांनी दृष्टी दोष असलेल्यांना नवीन दृष्टी देण्याचे कार्य केले आहे. निस्वार्थ भावनेतून त्यांचे हे कार्य सुरु असून, कोरोनाच्या संकटकाळात देखील त्यांनी गरजू रुग्णांना शिबिराच्या माध्यमातून मोठा आधार दिला. तसेच नेत्रदान चळवळीत उत्कृष्ट कामगिरी करुन अनेकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित केले. तर त्यापैकी काहींनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प देखील पूर्ण  केला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श नेत्रसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे सचिव जयंत महाडिक यांनी सांगितले आहे.या पुरस्काराचे वितरण लवकरच नागपूर येथे केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष अशोकराव लोखंडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top