मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याबाबत नगर मधील सर्व मराठा नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर करण्याकरता तहसील कार्यालयात सर्व मराठा नगरसेवक सहभाग नोंदवणार.
नगर, प्रतिनिधी. (27. ऑक्टोबर.2023.) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणेबाबत नगर मधील सर्व मराठा नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर करण्याकरता शनिवार,28 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात सर्व मराठा नगरसेवक सहभाग नोंदवणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आली. तरी समाजातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.