ज्येष्ठ पत्रकार आयेशाखान मुलानी यांची बहुजन समता सेना संघटनेच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी निवड.

Ahmednagar Breaking News
0

ज्येष्ठ पत्रकार आयेशाखान मुलानी यांची बहुजन समता सेना संघटनेच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी निवड.


छत्रपती संभाजीनगर,प्रतिनिधी.(27.जानेवारी.2024.) : 24जानेवारी रोजी छत्रपती संभाजी नगर येथे बहुजन समता सेना या सर्वधर्म सर्वपक्षीय संघटनेच्या महत्त्वाच्या पद नियुक्ती देण्यात आल्या.त्यावेळेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तात्याराव ससाने यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष विनोद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली  प्राचार्य तथा माजी नगरसेविका व ज्येष्ठ पत्रकार आयेशा मुलानी खान यांची महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली व तसेच संघटनेचे सुरुवातीपासून कार्य करत असणाऱ्या मनकरणाबाई डांगे यांची मराठवाडा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी अभय गडकरी यांची देखील जालना जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.संघटनेचे महाराष्ट्र संघटक जमीर भाई पठाण,जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ त्रिभुवन,शरद ससाने,बालाजी आडीयाल ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडीबद्दल ज्येष्ठ पत्रकार आयेशा मुलानी खान यांच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top