प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणे निमित्त सद्गुरु शंकर महाराज मठात विविध धार्मिक कार्यक्रम.

Ahmednagar Breaking News
0

प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणे निमित्त सद्गुरु शंकर महाराज मठात विविध धार्मिक कार्यक्रम.

नगर, प्रतिनिधी.(20.जानेवारी.2024.) : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापणे निमित्त सद्गुरू शंकर महाराज मठ.कल्पतरू मठ,कल्याण रोड, अहमदनगर येथे सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्य सकाळी 6:00 वाजता श्रींचा रुद्राभिषेक करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 7:00 वाजता आरती, दुपारी 12:00 वाजता आरती, दुपारी 12:30 ते 3:00 वाजेपर्यंत महाप्रसाद, सायं.4:30 ते 6:30 श्रींचा पालखी सोहळा, सायं 6:45 ते 7:15 आरती, सायं 7:15 ते 8:30 धार्मिक कार्यक्रम, रात्री 8:45 पासून महाप्रसादाचा कार्यक्रम होईल अशी माहिती मठाच्या वतीने देण्यात आली आहे. तरी मंदिर परिसरातील नागरिकांनी, भाविकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top