नगर मधील प्रथितयश गायिका अपूर्वा निषादचे "रामा ओ रामा " हे गाणे अयोध्येच्या सजावटमध्ये वाजत आहे.
नगर, प्रतिनिधी. (18. जानेवारी.2024.) : अहमदनगर मधील अपूर्वा निषाद ही सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडे गायनाचे धडे गिरवत आहे.या सांगितिक प्रवासात अपूर्वा निषादच्या अतिशय गाजलेल्या "महानिर्माण घडवुया",या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती मिळवली आहे.शिवाय एम.डब्ल्यु. एम. प्रस्तुत प्रसिध्द संगीतकार, गायक डबू मलिक यांच्या "तुम कभी ना भुलना" या अभय जोधपूरकर सोबतच्या गीताने अपूर्वा निषादला फार लोकप्रियता मिळाली.
अपूर्वा निषाद हिने अयोध्येत राममंदिर आणि श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भावनिक स्थितीला अतिशय उत्कटतेने नवीन गीत रिलीज केले आहे.
"रामा ओ रामा" या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः अपूर्वा निषाद ने गाणे कंपोझ केले आणि गायले आहे.फार कमी वेळात सोशल मीडियावर ट्रेडिंग ठरलेल्या या गीताचा समावेश पंतप्रधान मोदीजी हे अयोध्या सजावट पाहात असताना अपूर्वा निषादचे गाणे वाजवले जात आहे.हा अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. तसेच बहुतेक सर्व अध्यात्मिक पेज व केंद्राने आपल्या सोशल नेटवर्किंग मध्ये हे "रामा हो रामा" गाणे ट्रेडिंग झाल्याचे कौतुकास्पद विधान केले आहे.आपणही सर्व रसिक श्रोत्यांचे, अपूर्वा निषादने चाहत्यांचे लक्ष लक्ष आभार मानले आहेत.