श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ. शिवाजीनगर,केडगाव, अहमदनगर येथे रविवारी धर्मनाथ बीजोत्सव सोहळा.
नगर,प्रतिनिधी.(08. फेब्रुवारी.2024.) : श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ. शिवाजीनगर,केडगाव,अहमदनगर येथे श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व कृपाशीर्वादाने माघ शु.2 वार रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी धर्मनाथ बीजोत्सव सोहळा 2024 संपन्न होणार आहे. या दिवशी सकाळी 07:00 ते 08:00 वाजता श्रींचा अभिषेक होईल. सकाळी 08:00 ते 11:00 यावेळेत महादत्तयाग व महानवनाथ याग, सकाळी 11:30 वाजता पूर्णाहुती, दुपारी 12:00 वाजता महाआरती होईल.त्यानंतर दुपारी 01:00 वाजता महापालखी सोहळा होईल. महाप्रसादाचे आयोजन दुपारी 01:00 ते 5:00 वाजेपर्यंत असेल.
संध्याकाळी 7:00 ते रात्री 10:00 या वेळेत विकास दादा पाटील.(अध्यक्ष.) व सर्व सेवेकरी वृंद श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठान,घोडबंदर रोड,ठाणे यांचा भजनसंध्या हा कार्यक्रम होईल.
तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज सेवा मंडळ. शिवाजीनगर,केडगाव,अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.