श्री.दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ,सर्जेपुरा द्वारा प्रस्तुत हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन.
नगर, प्रतिनिधी.(21. मार्च.2024.) : सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये श्री.सप्तशृंगी सामाजिक,सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने श्री.दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ,सर्जेपुरा द्वारा प्रस्तुत हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि.20 मार्च रोजी सायंकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी परिसरासह शहरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सर्वप्रथम हनुमान चालीसा पाठ करण्यात आले. त्यानंतर अचानक कार्यक्रमात साक्षात हनुमानजी अवतरले. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांना आपापल्या मोबाईल मध्ये फोटो,व्हिडिओ शूटिंग काढण्याचा मोह आवरेनासा झाला.