आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ओपन जिमचे लोकार्पण.

Ahmednagar Breaking News
0

श्री.गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून मंदिर परिसरातील ओपन स्पेस मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ओपन जिमचे लोकार्पण.


नगर, प्रतिनिधी. (05. मार्च.2024.) : आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मा.नगरसेविका सौ.ज्योती गाडे यांच्या पाठपुराव्यातून आणि अहमदनगर जिल्हा नियोजन समिती यांच्यामार्फत नवले नगर,गजानन महाराज मंदिर ओपन स्पेस मध्ये खुली व्यायाम शाळा (ओपन जिम ) चा लोकार्पण करण्यात आला. यावेळी उद्योजक अमोल गाडे, अभिजित खोसे, सागर मुर्तडकर ,वैभव वाघ, राजू मंगलारप, कुमार नवले, संपत नलावडे, अशोक गायकवाड, मा.नगरसेवक रामदास आंधळे, इंजि.केतन क्षीरसागर, बाळासाहेब जोगदंड ,निशिगंध प्रभुणे, निखिल जगदाळे,नितीन शेलार, एकनाथ चावरे, आदिनाथ म्हस्के, सचिन तनपुरे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नागरिक आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही.प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे, यासाठी आम्ही नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी ओपन जिमची उपलब्धता करून दिली आहे. सध्याचा तरुण वर्ग हा मोबाईलच्या आहारी जाऊन स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशा तरुणांना देखील या जिमच्या माध्यमातून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येईल.

या ओपन जिमसाठी लागणारे साहित्य लवकरात लवकर मिळावे यासाठी मा.नगरसेविका सौ.ज्योती गाडे यांनी पाठपुरावा केला आहे. या कार्यक्रमात आभार नवले नगर रहिवासी सेवा संस्थाचे अध्यक्ष कुमार नवले यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top