!! गण गण गणात बोते.!!
श्री.गजानन महाराजांच्या पादुका शनिवारी भाविकांच्या दर्शनासाठी सावेडी उपनगरात येणार.
नगर, प्रतिनिधी. (31. मे 2024.) : समर्थ सद्गुरु श्री.गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुका शनिवार 01 जून 2024 रोजी सायं.05:00 ते 08:00 यावेळेत सावेडी उपनगरात येणार आहेत. तरी भाविकांसाठी सदरील पादुका दर्शनासाठी चंद्रशेखर (नाना) गटणे यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहेत, याचा भाविकांनी लाभ घ्यावा.
सदरील पादुका खुद्द श्री.गजानन महाराज यांनी त्यांचे निर्वाण भक्त केदार महाराज यांना दिलेल्या आहेत. याचा उल्लेख गजानन महाराजांच्या ग्रंथातील 19 अध्यायात केलेला आहे.सध्या या पादुकांची सेवा देखभाल केदार महाराज यांचे भक्त बळीराम वीरखरे पाटील यांची नात कल्पना चौधरी या करीत आहेत.त्या काचुरणे,अमरावती येथील रहिवासी आहेत.
श्री.चंद्रशेखर (नाना) गटणे.
बहार हौसिंग सोसायटी, नगरसेवक निखिल वारे यांच्या घराजवळ,अनुरॉन अपार्टमेंट शेजारी,सावेडी, अहमदनगर.7030331515./ 8087138295.