नगर, प्रतिनिधी. (20.जुलै. 2024.) : आज महाराष्ट्र वीज विद्युत महामंडळाच्या सावेडी सेक्शनकडून पावसापूर्वी अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांदया, पोलवार चढलेल्या वेली, नादुरुस्त AB स्विच, लूज गाळे, वाकलेले पोल सरळ करणे, डीपी मधील कट आउट बदलणे, झुकलेल्या लाईनला स्टे देऊन सरळ करणे,
ए.बी. स्विच चे जंपर क्रीम्पिंग करणे,सबस्टेशन मधील जंपर क्रीम्पिंग करणे यासह अनेक प्रकारची कामे आज करण्यात आली. या कामांसाठी असिस्टंट इंजिनियर जगन्नाथ बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक आव्हाड, आप्पासाहेब चव्हाण, अनंता मोरे, शरद वाडकर, अखलाक शेख, अनिल दुसुंगे, विशाल बडे यांनी वरील कामे केली.