नगरमधील रहिवासी एस.एंटरटेनमेंट सेलिब्रेटी अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे संचालक सुमित तनपुरे यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार 2024 प्राप्त....
नगर, प्रतिनिधी. (14.ऑगस्ट. 2024.) : नगरमधील रहिवासी असलेले सध्या पुणे स्थित एस.एंटरटेनमेंट सेलिब्रेटी अँड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक सुमित दिलीप तनपुरे यांना महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार 2024 त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा पुणे येथे मराठी प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर यांच्या हस्ते सुमित तनपुरे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे सुमितचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारची सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसताना सुमितने या क्षेत्रात नावलौकिक केल्यामुळे नगरकरांना त्याचा अभिमान वाटतो.
ABN शी बोलताना सुमितने सांगितले की मी प्रथम स्विफ्टएनलिफ्ट मीडिया ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ निलेश साबे यांच मनःपूर्वक आभार मानतो, त्यांनी मला महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार 2024 साठी उत्कृष्ट काम करतो यासाठी त्यांनी मला गौरविले. त्यांच्याकडून माझ्या कामाची दखल घेण्यात आली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.