आ.संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशन आयोजित " लाडकी होम मिनिस्टर " खेळ पैठणीचा, वर्षाव बक्षिसांचा....
नगर, प्रतिनिधी. (28.सप्टेंबर. 2024.) आ. संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील (प्रभाग 4) महिलांसाठी सोमवार दि.30/09/2024 रोजी सायं ठिक 5 :00 वाजता, गंगा उद्यान चौक, मिस्किनमळा, सावेडी, अ.नगर येथे खेळ पैठणीचा व लकी ड्रॉ हा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला असून अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. तरीही जास्तीत जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे आपल्याकडे असलेल्या कुपणावरील सर्व माहिती भरून कार्यक्रमाच्या दिवशी गंगा उद्यान येथे सायंकाळी 5:00 वा.पर्यंत जमा करावे. (कूपन नसल्यास कार्यक्रमस्थळी कुपन उपलब्ध होतील.) सदर कार्यक्रमा नंतर स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क.
9225522255 / 8796101919.